लोहगड
इतिहास : लोहगड किल्ला हा मजबूत , बुलंद आणि दुर्जेय आहे . किल्ल्याची निर्मिती जवळ असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली , त्याहीपूर्वी म्हणजे सत्ताविशसे वर्षापूर्वी झालेली असावी असे अनुमान निघते . सातवाहन , चालुक्य , राष्ट्रकुट , यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पहिल्या इ . स . १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाही स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले . त्यापैकीच लोहगड हा इ . स . १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुऱ्हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता . इ . स . १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला . १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड - विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला . इ .स . १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन के...