मी रायगड बोलतोय
किती वर्ष झाली असतील, किती युग म्हणायला हवी खरं तर
मी इथेच अविचल उभा आहे भूतलावरील ध्रुवतारा सारखा सागर तीराची ती सुवर्णरेषा मी युगानयुगे समोर पाहत आलोय. त्यातुन उतरणारे ते लमा नानचे तांडे आणि वाहून येणारा व्यापाऱ्यांचा माल मी याच डोंगरातून जाताना पाहिलाय. माझे महत्व कळले तेव्हा याच क ड्या कपाऱ्याना तटा बुरुजाचे लेन चढवण्यात आले. प्राण हाती घेऊन लिगानाचे बेलाग कडे सर करणारे नरवीर मी इथून पाहिले.
मी मी रायगड.
रायगड हे माझे अखेरचे आणि देशोदेशी प्रख्यात झालेले नाव. या शिवाय तुम्ही मला अनेक नावांनी ओळख ता . नंदादीप, रशिवटा, तनसाचा डोंगर, रायरी ही देखील माझीच नावं. आजचं हे माझं रूप महाराष्ट्राच्या पहिल्या वहिल्या छत्रपतींनी दिलेलं.१६५६ च्या कड क उन्हाळ्यात माझ्या आसमंतात या श्रीमंत योग्याचा पहिला प्रवेश झाला. माझं हे रांगड दर्शन होताच त्या जाणत्या राजानं आपल्या मनीची ईच्छा मला बोलून दाखवली "गड बहुत चखोट चौतर्फा गडाचे कडे तासल्या प्रमाणे , धोंडा एकच तासिव , दौताबाद पृथ्वीवर च खोट गड खरा परंतु उंचीने थोडका, दौताबाद चे दशगुनी उंच तख्ततास जागा हाच गड करावा.
१६७० साली नावारूपाला आले ल स्वराज्य शिवरायांच्या कर्तुत्वाने, जिजाऊ साहेबांच्या ममतेने , अष्टप्रधानां च्या निष्टेन, रामराजे आणि शंभुराजे यांसारख्या अभिमन्यू च्या वारस दरांसमवेत या महादरवाज्यातून प्रवेश कर्ते झाले.
जयविजया सारखे खंदे बलाढ्य बुरुज बांधून हिरोजी इंदुलकर नामक त्या निष्णात दुर्ग पंडिताने म ला सुरक्षित केले. माझ्या या ह्रुदयात प्रवेश करण्याचा हा दरवाजा त्यांनी शत्रूपासन असा गुपित ठेवला की सहजा सहजी त्याच दिसणं ही शत्रूला अशक्य.
इथल्या पायऱ्या चढून मराठ्यांचे वैभव वर गेले.
टकमक टोका चे भय विचारावे स्वराज्याच्या शत्रूंना. इथून वर येण्याचा अधिकार फक्त भारराट वाऱ्याला आणि उतरण्याचा अधिकार फक्त पाण्याच्या धारेला.
ह्याच टकमक टोकावरून कित्येकां चे कडेलोट झालेले मी पाहिलेत.
कणाक नाणे वाढणारे स्वराज्य इथल्या प्रत्येक घरात फुलताना मी पाहिलंय.
मोहीम फत्ते करून आलेल्या शिलेदारांना ओवाळणा ऱ्या गृहलक्षुमीचे चि त्र आजही माझ्या डोळ्यासमोर आहे.चोऊबाजुला होणारे रात्रंदिवस युध्दाचे प्रसंग आणि शिवछत्रपतीनी आणि त्यांच्या मावळ्यांनी दिलेला लढा मी अनुभवलाय
बालेकिल्ल्यात बसून आऊसाहेबाशी चर्चा करणारा शिवबा शिवछत्रपती होताना मी पाहिलाय.
भारतातील सप्त नद्यांच पवित्र तीर्थ गंगासागरात आणून ओतले गेले तेव्हा मी ही अभिशिप्त झालो. महाराज छत्रपती झाले.
सातासमुद्रपार चे राज्यकर्ते येऊन मुजराकर्ते झाले. त्यांच्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी झुकल्या. होळीच्या माळाव रून निघालेली ती भव्यमिरवणूक माझ्या अंगावर आजही रोमांच उभे करते. हत्तीवर असलेल्या सोन्याच्या अंबारित झुलत जाणारे मराठ्यांच्या छत्रपतींचे वैभव मी उरात साठवले आहे.
मंदिराच्या भिंतीवर शिलालेख कोरला जात होता , तेव्हा मी ही कुतुह लाने त्याकडे पाहत होतो.
तो शिलालेख आजही आहे . रायगड आजही उभा आहे. आणि जोवर चंद्र सूर्य आसमंतात झळकतील तोवर मी रायगड असाच चिरंजीव उभा असेन.
"! जगदंब"!